नेहमीचे प्रश्न

1. मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

policerecruitment2024.mahait.org या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि 'नोंदणी करा' वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.

2. उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का?

उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

3. मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल?
ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा - पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता.

4. ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा/इंटरनेट जोडणी खंडित झाली. मी काय करावे?
तुम्ही पुन्हा ऑनलाईन याल, तेव्हा शुल्क भरणा पर्याय निवडून पुन्हा भरणा करू शकता.

  • भरणा प्राप्त झाल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकता.
  • भरणा प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल.
5. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल?

तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.

6. मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय ?

नाही. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

7. ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल ?

तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मोड्युल्समधील माहिती अद्ययावत/ बदल करू शकता (नोंदणी तपशील वगळता). यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाचे पूर्वदृश्य दर्शविले जाईल. ही माहिती योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

8. स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे?

छायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीईजी/पीएनजी/टीआयएफएफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे.

9. ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी मी कोठे संपर्क साधावा?

तुम्ही mahapolicerecruitment.support@mahait.org येथे ई-मेल द्वारे अथवा 022-61316418 या आमच्या मदत कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू सकता.

10. मी पासवर्ड विसरलो/विसरले तर ?
  • मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा.
  • सादर करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल.
  • अन्यथा 022-61316418 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा
11. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय?

होय. अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता. मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.